Devendra Fadnavis Speech: छत्रपती संभाजीनगरमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी आंदोलकांनी गोंधळ घातला आहे. मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप करत या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होताच या कार्यक्रमात उपस्थित असलेले काही ओबीसी आंदोलक अचानक उठले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभास्थळी गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या ओबीसी आंदोलकांना बाजूला नेत ताब्यात घेतलं आहे.
स्टेशनवर चहा विकायचे वडील, पैशांअभावी स्वप्न राहिले अधुरे; PM मोदींना करायचं होतं ‘या’ क्षेत्रात काम
दरम्यान, मुक्तिसंग्राम दिनानिमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध संस्था, संघटनातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणावरून रणकंदन, बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या?
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून गोंधळ सुरू असताना ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली काल अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात पार पडली. या बैठकीला पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, वनमंत्री गणेश नाईक आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या वेळी सविस्तर चर्चा झाली.
दरम्यान, बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले आहेत. ओबीसी समाजासाठी प्रलंबित असलेला २,९३३ कोटी रुपयांचा निधी १५ दिवसांत वितरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

