Nanded News : दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिला धडकल्या उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात.
नांदेड शहरातील कलामंदिर भागातील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी या भागातील महिला, पुरुष थेट उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात धडकले. कलामंदिर भागात नागरी वसाहतीत दारू दुकान आहे. या दुकानातून दारु घेऊन भर रस्त्यावर मद्यपी दारु पितात, त्यामुळे महिला, तरुणी आणि विद्यार्थ्यांनीना त्रास सहन करावा लागतो. शिवाय महिला आणि तरुणींची छेड काढत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. दारूची डुकान बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा महिलांनी दिला.
