Ravi Ghai Graviss Group : गौरव घई यांनी वडील रवी घई, बहीण गौरिका चंडोक, मेहुणे जसप्रीत (सनी) चंडोक आणि भाचा इशान चंडोक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एक सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या तक्रारीत गौरव घई यांनी वडील रवी घई, बहीण गौरिका चंडोक, मेहुणे जसप्रीत (सनी) चंडोक आणि भाचा इशान चंडोक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय, पीटर फर्नांडिस नावाच्या एका सल्लागारावरही कटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘मुंबई मिरर’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
घई कुटुंबात कलह
यापूर्वी रवी घई यांच्या 78 वर्षीय पत्नी गीता घई यांनी पतीवर संपत्तीचा अपव्यय आणि वारंवार व्यभिचार केल्याचा आरोप केला होता. रवी घई यांनी पुत्र गौरव घईंना सार्वजनिक नोटिशीद्वारे बेदखल केल्यानंतर हे आरोप झाले होते. आता दाखल केलेली तक्रार ‘ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटी लिमिटेड’ (जीएचएल) संबंधित असून त्याचे बाजार भांडवल 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गौरव घई यांनी केलेल्या तक्रारीनुसार, घई कुटुंबातील सदस्यांनी 2021 आणि 2023 मध्ये कौटुंबिक समझोता करार (FSA) केले होते.
2021 च्या कौटुंबिक समझोता करारानुसार, गौरवने त्याचे वडील रवी घई यांना 240 कोटी रुपये दिले आणि वार्षिक 1.5 कोटी रुपये देण्याचे मान्य केले. या बदल्यात, एका ट्रस्टमध्ये असलेले जीएचएलचे 2.29 कोटी शेअर्सचे लाभार्थी मालकी हक्क रवी घई यांच्या मृत्यूनंतर गौरवला हस्तांतरित होणार होते.
गौरवचा असा दावा आहे की त्याने ‘सॅटिनेटा एलएलपी’मधील त्याची 49 टक्के भागीदारी देखील कराराचा भाग म्हणून रवी घई यांच्याकडे सोपवली. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.
Raigad Crime : इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने उरणच्या 16 वर्षीय मुलाचे 17 वर्षांच्या मुलीशी शरीरसंबंध, गरोदर राहताच…
वडिलांच्या कॅन्सरचा खोटा दावा
माझ्या वडिलांना कर्करोग झालेला नाही. बहीण गौरिकाने निव्वळ सहानुभूती मिळवण्यासाठी तसा बनाव करण्यास सांगितल्याचा दावाही गौरवने केला आहे. रवी घई यांनी मात्र गौरवचे आरोप निराधार आणि तथ्यहीन असल्याचा दावा केला आहे.
ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल पाडणार, स्थानिकांचा विरोध; भाजप आमदार कालिदास कोळंबकरांचा इशारा
यापूर्वी रवी घई यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी गौरव घईंवर आपली बनावट स्वाक्षरी करुन फसवणूक, कंपनीचा बळकवणे आणि मासिक भत्ते बंद करणे यासारखे गंभीर आरोप केले होते.
अर्जुन-सानियाचा साखरपुडा
दरम्यान, महिन्याभरापूर्वी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा साखरपुडा मुंबईत पार पडला. सानिया ही गौरिका आणि जसप्रीत यांची मुलगी आहे. सानिया ही अर्जुनची बालमैत्रीण असून अर्जुनची बहीण साराच्या पुढाकारानंतर दोघांमध्ये नातं फुललं.
Hyderabad Murder : विवाहितेचा जीव घेतला, घरात आंघोळ करुन कपडे बदलले, पळून जाताना लिफ्टच्या सीसीटीव्हीत निर्लज्जांचे हसरे चेहरे कैद
रवी घई कोण आहेत?
रवी घई हे ग्रेविस ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून हा समूह हॉस्पिटॅलिटी आणि फूड व्यवसायात सक्रिय आहे. या समुहाकडे मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथील इंटरकाँटिनेंटल हॉटेल आणि द ब्रुकलिन क्रिमरी यासारखे मोठे ब्रँड आहेत. ग्रेविस ग्रुप हॉटेल्स, आईस्क्रिम आणि फ्रोझन डेझर्ट उद्योगात कार्यरत असून’Kwality’ हा त्यांचा आईस्क्रिम ब्रँड लोकप्रिय आहे.

