Nandurbar Officer Found Dead: औषध निर्माण अधिकारी रात्री जेवण करुन झोपायला गेले आणि ते परत कधीच उठले नाही. त्यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
रात्री जेवण करुन झोपायला गेले, ते उठलेच नाहीत
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील रहिवासी असलेले अजय धनसिंग डोहलिया (वय 53) हे तळोदा तालुक्यातील प्रतापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत होते. 9 सप्टेंबर रोजी त्यांनी दिवसभराचे काम करून रात्री जेवण केले. त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास तेथे असलेल्या सरकारी निवासस्थानातील खोलीत झोपण्यासाठी ते निघून गेले.
Solapur Crime: दीड वर्षांपूर्वी नर्तिकेच्या प्रेमात, लाखो उडवले; तिच्याच घरासमोर जीव दिला, माजी उपसरपंच प्रकरणाची INSIDE STORY
कर्मचाऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद नाही
सकाळी आठ वाजले तोपर्यंत त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडलेला नव्हता. त्यावेळी आरोग्य केंद्रातील महिला परिचर भारती पाटील यांनी दरवाजा ठोठावून चावी मागण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत त्यांनी वरिष्ठांना कळवले. त्यानंतर तेथे डॉ. योसेफ रघु गावीत व इतर सहकाऱ्यांनी खोलीच्या मागील बाजूस जाऊन पाहणी केली. खोलीत प्रवेश केला त्यावेळी त्यांना तेथे अजय डोहलिया मृतावस्थेत आढळून आले.सदर घटनेची माहिती मिळताच डॉ. दिनेश रावताळे यांनी सकाळी 9 वाजता वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी डॉ. योसेफ रघु गावीत यांच्या खबरीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अधिकाऱ्याच्या मृत्यूचे अचूक कारण समजू शकलेले नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत स्पष्टता येणार येणार आहे.

