Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता जमा न झाल्याने महिला नाराज आहेत. गणेशोत्सवातही पैसे न मिळाल्याने त्यांची प्रतीक्षा कायम आहे. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे याच महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पैशांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या महिलांसाठी खुशखबर म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे ३ हजार रुपये याच महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही महिन्यांचे पैसे याच महिन्यात जमा होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र दोन्ही हप्ते एकत्र येणार की दोन वेगवेगळ्या तारखांना हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Devendra Fadnavis : ‘तुमच्यामुळे आमचं सरकार, पुढील पाच वर्ष…’; लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
दरम्यान लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरु झाल्यापासून अनेक महिलांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे गेल्या काही महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. योजनेच्या स्क्रूटिनी बद्दल भाष्य करताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, आमच्याकडे लाडक्या बहिणींसाठी हे रजिस्ट्रेशन होतं, ते 2 कोटी 63 लाखांपेक्षा जास्त होतं. सगळ्या विभागाकडून आम्ही डेटा मागवला होता.
नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण असे एकत्र करून त्यांना 1500 रुपये दिले गेले. त्यात नमो शेतकरी योजनेचे 1000 लाख रुपये आहेत. स्क्रूटिनी केल्याने तो आकडा 2 कोटी 48 लाखांवर आला असल्याचे अदिती तटकरेंनी नमूद केले. स्क्रुटिनी केली नसती तर हा आकडा कमी झाला नसता, असेही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या थेट धनलाभाचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला तसेच हजारो पुरुषांनीही बोगसपणे नोंदणीकरुन पैसे लाटल्याचे उघड झाले. दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी असणाऱ्या योजनेचा असा गैरफायदा घेत असल्याने कारवाई होणार असल्याचे मंत्री तटकरेंनी स्पष्ट केले आहे.

