Akola Son Murder Father : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक संतापजनक आणि भयानक घटन अकोला जिल्ह्यात घडली आहे. बार्शीटाकळी तालुक्यात पोटच्या मुलानेच दारुच्या नशेत आपल्या बापाची हत्या केली आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात काल मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास 24 वर्षीय मुलगा नवनाथ बबन राऊत याने दारूच्या नशेत त्याचे वडील वर्षीय बबन रामराव राऊत (वय 55) यांचा काठी व दोराच्या सहाय्याने डोक्यावर वार करून खून केल्याची घटना घडली आहे. मुलाने बापाचा खून केल्याची घटना वाऱ्यासारखी गावात पसरताच गावातील पोलीस पाटील पवन जाधव यांनी पिंजर पोलीस ठाण्याला तातडीने दिली.
मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या GR विरोधात आंदोलन करणं थांबवा, छगन भुजबळ यांचं ओबीसी नेत्यांना आवाहन
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. हत्या करणारा मुलगाच असल्याचं निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत, आरोपी नवनाथ राऊतला वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार जवळ चिखली गावातून अटक करण्यात आली. परंतु नावनाथने जन्मदात्या बापाचा खून का केला? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांच्या तपासात खरं कारण समोर येईल. मात्र पोटच्या गोळ्यानेच जन्मदात्या बापाचा खून केल्यानं समाजमन सुन्न झालं आहे.
Harshwardhan Sapkal : कामठीत काँग्रेसचा हल्लाबोल; बावनकुळे यांच्या मतदारसंघातूनच मतचोरीचा प्रयोग, प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप
उतरत्या वयात ज्या काठीचा आधार घेऊन जिवन जागण्याचं स्वप्न पाहिलं जातं, त्याच काठीकडून आयुष्याचा शेवट व्हावा, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यात दारूची नशा आयुष्य उध्वस्त करते. तरीही तरुण त्याच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करतात. दारूच्या नशेत केलेल्या कृत्याने नावनाथला कदाचित पश्चातापही होईल. पण आता वेळ निघून गेलेली असेल. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

