• Sun. Sep 6th, 2026

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, परिसरात तणाव, पोलीस घटनास्थळी

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, परिसरात तणाव, पोलीस घटनास्थळी

अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका तरुणाने हल्ल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका तरुणाने हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. त्याच्यासोबत हस्तांदोलन करत असताना त्याने आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी खताळ यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांचा जीव वाचवला आहे. संगमनेर फेस्टिवलट्या उद्घाटनावेळी हा प्रसंग घडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमोल खताळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल होत आहेत.

नेमकं काय घडलं?

संगमनेरचे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरुवारी हल्ल्याचा प्रयत्न झाला. खताळ एका कार्यक्रमात गेले होते. तेथून परतत असताना ते नागरिक आणि कार्यकर्त्यांशी हस्तादोलन करीत होते. त्यावेळी एकाने हस्तआंदोलन करण्याच्या बहाण्याने जवळ जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ (खांडगाव, संगमनेर ) असं हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खताळ यांच्यात विविध मुद्यावरून वाद सुरू आहेत. ताज्या घटनेमुळे पुन्हा वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून घटनेचा निषेध

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. “मी प्रथमता या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. या हल्ल्यातील जे गुंड होते ते कुणाचे पुरस्कृत होते? पोलिसांना या हल्ल्याबाबत चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत. पण अशाप्रकारचे भ्याड हल्ले करुन महायुतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आत्मविश्वास कमी होईल, असं कुणाला वाटत असेल, पण त्यांचा तो गैरसमज आहे. त्यांचा तो गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही. कायदा होतात घेणं योग्य नाही. कायदेशीर प्रक्रिया आहे. ती आता पूर्ण करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी सूचना दिली आहे”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्ल्याच्या घटनेवर दिली आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा