• Fri. Sep 11th, 2026

अपहरणाच्या प्रयत्नातून बचावली पाच वर्षांची बालिका

ByMH LIVE NEWS

Aug 25, 2025
अपहरणाच्या प्रयत्नातून बचावली पाच वर्षांची बालिका
 कोल्हापूर 
कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका पाच वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न शेजारच्या महिलेच्या धाडसामुळे फसला आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील वैभवनगर वसाहतीत हा प्रकार घडला आहे. रूम भाड्याने घेण्याचे कारण सांगत एक अनोळखी महिला गल्लीबोळांतून फिरत होती. तिने एका घराच्या मागे एकटी खेळणाऱ्या एक 5 वर्षांच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेजारीच राहणाऱ्या महिलेने सतर्कता बाळगून त्या मुलीला वाचवलं आहे. ही थरारक घटना रविवारी सायंकाळी घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.रविवारी सायंकाळी, पन्हाळ्यातील कोडोलीतील वैभवनगर भागात अनोळखी महिला ‘रुम भाड्याने पाहिजे’ म्हणत फिरताना, अत्तार कुटुंबाची पाच वर्षांची मुलगी उमिरा ही घराच्या मागे एकटी खेळत होती. ती एकटीच असल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे पळवून नेण्याचा विचार करत त्या महिलेने क्षणार्धात उमीराला उचलले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र उमीराने घाबरून आरडाओरड केल्याने शेजारच्या कमल ढेरे यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी धाडसाने पाठलाग करून चिमुकलीची सुटका करत आरोपी महिलेला पळवून लावले.

या घटनेनंतर आरोपी महिलेने जवळच उभ्या असणाऱ्या चारचाकी गाडीतून पलायन केले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करत पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असून, अपहरणकर्त्या महिलेचा कसोशीने शोध घेतला जात आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेनंतर कोडोली परिसरासह तालुक्यातील पालकांमध्ये भीती आणि चिंता आहे. एकट्याने मुलांना खेळायला सोडायचे की नाही, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह नागरिकांसमोर उभे राहीले आहे. तर मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांनी एकमेकांनाच केले आहे.

दरम्यान, कमल ढेरे यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. शेजारधर्म निभावत त्यांनी दिलेले साहाय्य परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे. घटनेने पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटना पुन्हा घडू न देण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिसांकडूनही अनोळखी व्यक्ती आणि संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

तम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed