• Sun. Aug 16th, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपली जमीन, आपले हक्क’ या कॉमिकचे प्रकाशन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 28, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपली जमीन, आपले हक्क’ या कॉमिकचे प्रकाशन – महासंवाद


पालघर दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज तारापूर येथे आपली जमीन, आपले हक्कया कॉमिकचे प्रकाशन झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावत वैयक्तिक व सामूहिक वनहक्क (वनपट्टा) तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून हातभार लावावा, यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे व प्रशिक्षित करणे हा या कॉमिकचा मुख्य उद्देश आहे.

आपली जमीन, आपले हक्कया कॉमिकमुळे कायदेशीर नोंदी अद्ययावत करून आदिवासी समुदाय अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

यावेळी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री  गणेश नाईकमत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित , जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड , डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed