Ambadas Danve vs Sandipan Bhumare : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात दोन विरोधक गप्पांत रंगल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते एकत्र आले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्री शिरसाठ, दानवे, भुमरे, जयस्वाल यांनी एकाच ताटातील काजूंचा आस्वाद घेतला.
काजू खाल्ल्याच्या प्रश्नावर नेते म्हणाले…
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, एका कार्यक्रमात 50 प्लेट ठेवलेल्या नसतात. एकच प्लेट असते प्रत्येक नेत्यांसाठी वेगवेगळे नसते. त्यामुळे एकाच यात आम्ही खुशीने खाल्लं असा अर्थ होत नाही. काजू फार गोड लागले नाही, असं दानवे म्हणाले.
राज ठाकरेंना शिवीगाळ, मनसैनिक भडकले; परप्रांतीय तरुणाच्या वॉशिंग सेंटरची तोडफोड
खासदार भुमरे म्हणाले, विकासाच्या कामांमध्ये आम्ही एकत्र येतो. राजकारणात विषय येतात तेव्हा वेगळे असतो. दानवेंना काजू गोड नसते लागले, तर त्यांनी खाल्लेच नसते. सगळं गोड लागलं दानवेंना. ड्रायफूट शरीरासाठी चांगले असतात, त्यामुळे खाल्ले पाहिजेत. सगळ्यांनी मिळून खाल्ले पाहिजेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला त्यामुळे पुढे देखील गोड लागेल, असा मिश्कील टोलाही खासदार भुमरेंनी लगावला.दरम्यान, दानवेंनी सरकारच्या कामावर शंका उपस्थित करत म्हटले की, आज वॉटर ट्रीटमेंट प्लँटचा शुभारंभ केवळ झाला आहे. मला सरकारने उत्तर द्यावं की, यातून किती दिवस पाणी मिळणार आहे. पाण्याचे दिवस काही बदलणार आहेत का? निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी करण्याचं काम सुरुय, अशी टीकाही दानवेंनी केली आहे.

