• Fri. Aug 28th, 2026
Maharashtra-Mumbai Rain Live Updates 3rd July 2026 : मुंबईला पावसाने झोडपलं, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पावसाचे लाईव्ह अपडेट्स अन् बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या

Mumbai Rains : मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर, तीन तासांसाठी IMD चा ऑरेंज अलर्ट, लोकल वाहतूक मंदावली, सखल भागही जलमय

मंगळवारपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात पावसाने केलेला मुक्काम शुक्रवारीही कायम आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबई शहर, उपनगर भागात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या शहरातही मुसळधार पाऊस आहे, तर नवी मुंबईतील वाशी-पनवेल परिसरातही पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुंबईला लागून असलेल्या वसई, नालासोपारा, विरार भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकलची वाहतूकही संथ गतीने सुरु आहे. सखल भाग जलमय झाल्यामुळे रस्ते वाहतूकही काहीशी मंदावली आहे. शुक्रवारच्या पावसाने अनेकांना वीकेंडच्या मान्सून ट्रिपचे वेध लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed