• Tue. Aug 25th, 2026

Amravati Hospital Fire: व्हेण्टिलेटर स्फोटात संशयाचा धूर? उपकरणांचा पुरवठादार, ऑडिट यांवर प्रश्नचिन्ह

मुंबई : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या ‘एनआयसीयू’मध्ये व्हेण्टिलेटर स्फोटानंतर आग लागून नवजात बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी, रुग्णालयाने आरोग्य विभागाकडे स्पष्टीकरण सादर केले आहे. मात्र, व्हेण्टिलेटरचा स्फोट होण्याची शक्यता अत्यल्प असते. ऑक्सिजनपुरवठा पाइपलाइन किंवा नवजात शिशू विभागातील विद्युत उपकरणांमध्ये स्पार्क होऊन दुर्घटना घडल्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली आहे. त्यामुळे या आगीतून संशयाचा धूर निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांत प्रक्रिया राबवून उत्तम गुणवत्ता असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून व्हेण्टिलेटरची खरेदी कमी होत असून कंत्राटदारांमार्फत अधिक झाली आहे. करोनाकाळात मुंबईसह राज्यातील सार्वजनिक रुग्णालयांना मिळालेल्या व्हेण्टिलेटरचे पुढे काय झाले, त्यातील किती वापरात आले, याचीही चर्चाही सुरू झाली आहे.

Amravati Fire: स्फोटासारखा मोठा आवाज अन् क्षणात आगीचा भडका; एनआयसीयूमधील परिचारिकेने उलगडला थरारयाच रुग्णालयाच्या नवजात विभागात अनेक वर्षे सेवा दिलेल्या बालरोगतज्ज्ञांच्या मते, प्रौढ रुग्णांसाठीच्या व्हेण्टिलेटरमध्ये ऑक्सिजन आणि हवा नियंत्रित प्रमाणात वापरली जाते. आधुनिक व्हेण्टिलेटर नवजात अर्भके आणि शिशू, अशा दोन्ही गटांसाठी वापरता येतात. बालकांचे वय, वजन यानुसार त्यांची क्षमता, ऑक्सिजनचा वापर ठरवला जातो. एनआयसीयूमधील व्हेण्टिलेटरची क्षमता, मॉडेल, उत्पादक कंपनी, देखभाल आणि दुर्घटनेवेळीची स्थिती यांचा तपास करणे गरजेचे आहे. घटनास्थळी ऑक्सिजनचे प्रमाण वाढलेले असताना विद्युत स्पार्क निर्माण झाल्यास आग वेगाने भडकण्याचा धोका वाढतो. त्यामुळे व्हेण्टिलेटरचा संभाव्य दोष आणि ऑक्सिजनयुक्त वातावरण यांचा परस्पर संबंध तपासणे महत्त्वाचे आहे.

अग्निसुरक्षेसाठी बैठक
राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे निकष पाळले जातात का, हे तपासण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने बैठक घेतली. सर्व रुग्णालयांचे अधिष्ठाता यास उपस्थित होते. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रकरणी चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

Maharashtra TimesAmravati Fire : बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावतीत अर्भकमृत्यू, बापाचा काळीज चिरणारा सवाल; आमचं लेकरु आहे तसं द्या, पोस्टमार्टम नको, कुटुंबांचा टाहोउपकरणांचे ऑडिट आवश्यक

जिल्हा रुग्णालयांच्या नवजात अतिदक्षता विभागांमध्ये वैद्यकीय उपकरणांची सुरक्षितता, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा आणि विद्युतभार यांचे ऑडिट गरजेचे आहे. एनआयसीयूमध्ये वापरली जाणारी उपकरणे अत्यंत संवेदनशील असतात. व्हेण्टिलेटर, रेडियंट वॉर्मर, मॉनिटर, सक्शन मशीन, ऑक्सिजन सिलिंडर या यंत्रणा एकाचवेळी कार्यरत असतात. त्यामुळे आगीचे कारण शोधताना या सर्व बाबींचा विचार आवश्यक आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed