पन्नास खोके असा उच्चार होताच आमदारांच्या पत्नी अंगावर धावल्याची घटना घडली आहे. विरोधकांनी या घटनेविरोधात काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडल?
रायगडमधील मुरूड परिसरात दरड कोसळली या दुर्घटनेमध्ये विठा गायकर या महिलेचा मृत्यू झाला. दरड कोसळलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तेथे शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवीही दाखल झाल्या. तेथील आढावा घेतना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, ही बाब गंभीर आहे यामध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे. जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. किती दिवस तो चिखलाचा रस्ता आणि सर्व सहन करणार. आमच्या जीवनाची किंमत आहे की नाही. गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या हे काय पन्नास खोके कोण काय? हे सर्व घाणेरडं चाललंय राजकारण आणि समाजकारण. त्यानंतर मागे उभ्या असलेल्या मानसी दळवी या पाटील यांच्या अंगावर धावून गेल्या. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली नाही.
अधिकाऱ्यांना मारहाण
2024 मध्ये मानसी दळवी यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती. अलिबागमधील आरसीएफ शाळा बंद करत त्यातील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजनचा घाट घातला जात होता. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे बोलले जात होते.

