Chiplun Retired Teacher Varsha Joshi Murder : जयेश गोंधळेकर यापूर्वी साताऱ्यात काम करत होता. तिथे त्याची गणेशशी ओळख झाली. दोघंही चांगले मित्र असल्याची माहिती तपासात समोर आलीये
जयेश गोंधळेकर यापूर्वी सातारा येथे काम करत होता. तिथे त्याची गणेश कांबळे याच्याशी ओळख झाली. दोघंही चांगले मित्र असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या दोघांनी मिळूनच वर्षा जोशी यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली.
चिपळूण पोलिसांनी गंभीर दखल घेत पुरावे गोळा केले. आरोपी जयेश हा चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातीलच रहिवासी आहे. पैसे आणि दागिन्यांसाठीच त्याने खू केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या गुन्ह्यात मित्र गणेशही सहभागी असल्याचे खुद्द जयेशने पोलिसांना सांगितले.
पहाटे वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा, मग अजितदादांची पुणेकरांसाठी मोठी घोषणा!
जयेशला कॉम्प्युटरमधील चांगले ज्ञान असल्याने त्याने हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज डीव्हीडीआर, कॉम्प्युटरमधील हार्ड डिस्क गायब केली होती. इतकंच नाही, तर जोशींचा मोबाईलही गायब करुन एका पाण्याच्या टाकीत टाकला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवलीच्या पुलावरुन या वस्तू त्याने फेकल्या होत्या. मात्र त्या पुन्हा एकदा शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. जयेश आणि गणेशने खून केल्यानंतर पद्धतशीरपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी जोशींच्या घरात मिळालेलं प्रवासाचे जुनं तिकीट आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज यावरुन अवघ्या दोन दिवसात जयेशच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलं.
Mumbai Crime : दुसऱ्या लग्नाची आस महागात, न्यूयॉर्कच्या डॉक्टरचा मधाळ बोलून गंडा, बोरिवलीच्या विवाहितेने स्वतःची…
जयेश ट्रॅव्हल एजंट असून त्याच्या माध्यमातून जोशींनी अनेकदा आसाम, पुणे अशा विविध ठिकाणी प्रवास केला होता. त्या हैदराबाद सहलीसाठीही जाणार होत्या. जयेशने त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्याकडे खूप पैसे व दागिने असतील या विचाराने जयेशने एका साथीदाराच्या मदतीने मोठा प्लॅन करुन निर्दयीपणे खून केला.
Satara Crime : दोन महिन्यापूर्वी ठरलेलं लग्न मोडलं, नवे पाहुणे बघायला येणार, त्याआधीच साताऱ्यात 25 वर्षीय जवानाने आयुष्य संपवलं
तोंडात कपड्याचे बोळे घालून, तोंड आणि मान दाबून त्याने जोशींचा खून केला. त्यांचे हात पायही यावेळी बांधण्यात आले होते. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो जोशी यांच्या घराच्या दिशेनेच येत असल्याचे दिसले. जोशींच्या घरात एक जुने प्रवास तिकीट मिळाले होते त्यावर जयेशचं नाव पोलिसांना आढळलं. अन्य माहितीवरून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झालं. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत

