Pune Couple Divorce : राज आणि प्रिया (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा 2018 मध्ये विवाह झाला. राज अभियंता आहे, तर प्रिया शिक्षिका. लग्नानंतर वर्षभरात त्यांना एक मुलगा झाला.
काय आहे प्रकरण?
राज आणि प्रिया (नावे बदलली आहेत) यांचा 2018 मध्ये विवाह झाला. राज अभियंता, तर प्रिया शिक्षिका आहे. उच्चशिक्षित आणि कमावत्या अशा या दाम्पत्याला लग्नानंतर वर्षभरात एक मुलगा झाला. मात्र, त्यानंतर या दाम्पत्यामध्ये खटके उडू लागले. एकमेकांशी पटत नसल्याने प्रियाने राजपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला, तर राजने घटस्फोट घेण्यासाठी पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला.
Pune News : दीडशे प्रवाशांसह फ्लाईट पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर, वेग पकडताच उजव्या इंजिनला पक्षी धडकला अन्…
पतीच्या वकील अॅड. जान्हवी देशपांडे-अधिकारी आणि अॅड. ऋतुजा खिवसरा यांनी त्याची बाजू मांडली. कौटुंबिक न्यायाधीश जी. जी. वायाळ यांनी हे प्रकरण मध्यस्थीसाठी अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांकडे पाठविले. त्यांनी दाम्पत्याचे समुपदेशन केले. मात्र, या दाम्पत्याने एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय आधीच घेतला होता.
मनसे कार्यकर्त्यांसोबतच्या वादानंतर पुणे पालिकाबाहेर सुरक्षा वाढली, कामगारांकडून कामबंद आंदोलन!
मुलाच्या भविष्यासाठी पोटगी मागितली
पतीपासून फारकत घेण्याची तयारी पत्नीने दर्शवली. मात्र, स्वतःसाठी काही न मागता फक्त मुलाच्या भविष्यासाठी पोटगी मागितली. पालकत्वाच्या जबाबदारीचे भान असलेल्या पतीने मुलाच्या भविष्याची तजवीज म्हणून 30 लाख रुपये एकरकमी देण्याचे कबूल केले. मुलाचा ताबाही पत्नीकडे देण्यास संमती दर्शवली.
Pune News : हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनी टेरेसवर NSG कमांडो सरसर उतरले, परिसरात घबराट, काही वेळातच पोलीस म्हणाले, ही…
कौटुंबिक प्रकरणांमध्ये मध्यस्थी ही फार महत्त्वाची भूमिका बजावते. सर्वोच्च न्यायालयाने ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ उपक्रमात कौटुंबिक वादांचे सामंजस्याने निराकरण करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणारे कौटुंबिक दावेही मध्यस्थीने निकाली काढण्यावर भर दिला जातो.
– अॅड. राणी कांबळे-सोनावणे, मध्यस्थ, कौटुंबिक न्यायालय

