• Thu. Sep 10th, 2026

शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 4, 2025
शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख – महासंवाद




मुंबई,दि. ०४: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी झारखंडच्या राजकारणात जवळपास पाच दशके समर्पित भावनेने कार्य केले. संसद सदस्य म्हणून त्यांनी झारखंडमधील सामान्य जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. मुख्यमंत्री असताना त्यांनी सामान्य नागरिकांचे  विशेषतः आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्यांच्या निधनाने झारखंडने एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आणि कुशल संसदपटू गमावला आहे.

दिवंगत शिबू सोरेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचे चिरंजीव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन व त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, असे राधाकृष्णन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed