Chatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. २१ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
कल्याणी परमेश्वर वायाळ, वय 21 वर्षे, राहणार सावरगाव वायाळ पिंपरखेड जिल्हा जालना, असं गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी ही शेतकरी कुटुंबातील आहे. ती औषध शास्त्रात शिक्षण घेत होती. कल्याणी काही महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास आली होती. ती साई इन्स्टिट्यूट डी फार्मसीमध्ये तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होती. सिडको एन-सेवन भागामध्ये भाड्याची खोली घेऊन तीन मैत्रिणींसह कल्याणी राहत होती.
Nanded News : गजबजलेल्या रस्त्यावर भरदिवसा तरुणीला फरफटत नेलं, बाईकवर टाकून अपहरण, थरारक VIDEO समोर, महाराष्ट्र हादरला
दरम्यान बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे सर्व मैत्रिणींनी मिळून त्यांच्या रुममध्ये स्वयंपाक केला. जेवण बनवल्यानंतर कल्याणीच्या सर्व मैत्रिणी डबा घेऊन महाविद्यालयात गेल्या, पण यावेळी कल्याणी रुममध्येच होती, ती मैत्रिणींसोबत कॉलेजला गेली नाही. दुपारच्या वेळी मैत्रिणी घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठावला, पण दरवाजा आतून उघडला नाही. मैत्रिणीनी आवाज देऊनही खोलीतून कल्याणीने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर खिडकीतून मैत्रिणींनी डोकावून बघितलं असता कल्याणी लटकलेल्या अवस्थेत दिसली. दरम्यान मैत्रिणींनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने तिला खाली उतरवून घाटी रुग्णाला दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं.
Pune crime news | कोंढवा परिसरात धक्कादायक घटना; डिलिव्हरी बॉयकडून दिवसाढवळ्या तरुणीवर अत्याचार
मोबाईल फॉरेन्सिक विभागाकडे
आत्महत्या करण्यापूर्वी कल्याणीने मोबाईल खोलीतील एका फळीवर उभा करून ठेवला होता. मोबाईलची स्थिती पाहता रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ कॉल करण्यासाठी तो तसा ठेवला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मोबाईल लॉक असल्यामुळे नेमकं काय घडलं हे समजू शकलं नाही, दरम्यान हा मोबाईल पोलिसांनी फॉरेनसिक विभागाकडे दिला असून फॉरेन्सिक विभागाच्या तपासातून सत्य समोर येईल.

