Chhagan Bhujbal : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी खात्यात झालेल्या कथित घोटाळ्याच्या आरोप यांमुळे धनंजय मुंडे यांना आपला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंच्या जागी छगन भुजबळ यांना मंत्र पद देण्यात आलं आहे. पण आता कृषी घोटाळा प्रकरणात धनजंय मुंडे यांना क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मंत्रिपद सोडणार का? असा प्रश्न विचारला असता भुजबळ संतापले.
मंत्रिमंडळाची स्थापना झाली त्यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आलं होतं. त्यावर छगन भुजबळ यांनी अनेकदा आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. “जहा नहीं चायना वहा नहीं रहना” हा त्यांचा एका चित्रपटाचा डायलॉग राज्यभर चर्चेत आला होता. त्यामुळे भुजबळांची नाराजी अजित पवारांची मोठे डोकेदुखी ठरली होती. ही नाराजी दूर करण्यात अजित पवार लवकरच यशस्वी ठरले. कारण धनंजय मुंडे यांना आपला आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला होता. नंतर धनंजय मुंडेंकडे असणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद छगन भुजबळ यांना देण्यात आलं.
मंत्रीमंडळाची स्थापना झाल्यापासून अजित पवार यांच्या आमदारांवर लागलेलं ग्रहण काय संपताना दिसत नाहीये. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून एकानंतर एक आमदार किंवा मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत आहेत. सर्वप्रथम मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज झाले होते, त्यानंतर धनंजय मुंडे यांचा निटवर्तीय वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून अढळला. त्यानंतर माणिकराव कोकाटे विधिमंडळात रम्मी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
दोन दिवसांपूर्वीच आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने दौंड येथे गोळीबार केला. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणी कुठेही थांबताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे त्यांचेच आमदार किंवा मंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढवत आहेत. दरम्यान येत्या काळात आणखीन नाही नवीन काही खुलासा समोर येत आहेत का? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

