Shiv sena demands check call details of bjp mla gopichand padalkar : सांगलीतील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त केला. शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे.
सांगलीमधील आटपाडी तालुक्यातील एका गावातील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने काही तरुणांचा सातत्याने होणारा त्रास, लैंगिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिसांत चौघांवर गुन्हे दाखल झालेले आहेत.
Sangli Crime : घरामागे कोणीतरी पूजा घातल्याचा संशय, पाटील कुटुंबाचं टोकाचं पाऊल, सासू-सुनेचा मृत्यू, बापलेक गंभीर
ही घटना घडल्यानंतर अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी हा विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. पीडित मुलीला व तिच्या नातेवाइकांना न्याय देण्यासह दोषींवर कडक कारवाईची त्यांनी मागणी केली. त्याचवेळी आमदार सुहास बाबर यांनी या घटनेत कोणाचा हस्तक्षेप असल्याचे उजेडात आणण्यासाठी पोलिस निरीक्षकांचे कॉल डिटेल्स काढावेत, अशी मागणीही केली होती.
Sangli News : जेवणात अळ्या आणि मिक्सरचं ब्लेड; विद्यार्थ्यांना मारहाण, मोहन माळी इंटरनॅशनल शाळेवर धक्कादायक आरोप
अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणातील दोषींचा पर्दाफाश होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही शिवसेनेची पहिल्या दिवसापासूनच भूमिका होती आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनावर कोणाचा दबाव होता काय? ही वस्तुस्थिती उजेडात आणण्यासाठी गृहविभागाने आणि पोलिस प्रशासनाने आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे या घटनेच्या कालावधीतील कॉल डिटेल्स काढावेत. यावेळी विटा खानापूर येथील शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
