Crime News : एका भावानेच भावाचा खून केला. किरकोळ भांडणामुळे आणि दारूच्या नशेत हे कृत्य घडले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रवींद्र तांबे याला अटक केली आहे. विनोद गणपत तांबे (वय ३६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दापोली तालुक्यातील उन्हवरे गावातील बौद्ध वाडीत घडली. रवींद्र, विनोद आणि त्यांची आई संगीता (वय ७५) येथे राहतात. विनोद मोलमजुरी करायचा, तर आई घरकाम करते. रवींद्र कोणताही कामधंदा करत नाही. दोघांनाही दारूचे व्यसन आहे. दारुच्या व्यसनापायी कामधंदा करत नसल्याने रवींद्रची पत्नी १२ वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली.

