राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. शरद पवार यांनी आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
जयंत पाटील गेल्या 7 वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष होते. 2018 साली पक्षाच्या प्रगतीच्या काळात अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखातर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. जयंत पाटील यांनी पदभार हाती घेताच सर्वात आधी महाराष्ट्राचा दौरा केला होता. राज्यभरात पक्षाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेतली होती. विविध कार्यक्रम देऊन संघटनेला कार्यरत ठेवण्याचे काम या कालखंडात केले. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही पक्षाकडून त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. यानंतर आता अखेर पक्षाकडून प्रदेशाध्यपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
(सविस्तर बातमी अपडेट होत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी कृपया आपलं वेबपेज रिफ्रेश करा)

