• Thu. Mar 12th, 2026

    मी जातो आहे, पण…; जयंत पाटील यांची कार्यकर्त्यांना भावूक करणारी कविता

    मी जातो आहे, पण…; जयंत पाटील यांची कार्यकर्त्यांना भावूक करणारी कविता

    Jayant Patil Poem : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त अखेर खरं ठरलं आहे. जयंत पाटील यांनी पदावरुन पायउतार झाल्यानंतर आज कार्यक्रमात कवितेतून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी त्यांची कविता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला भिडली. कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांच्या कवितेचं कौतुक केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अखेर पक्षात भाकरी फिरवली आहे. त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली आहे. शरद पवार यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा देखील करण्यात आली. यावेळी पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील आपल्या भावना मांडल्या. जयंत पाटील यांनी कवितेतून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्यांची कविता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भावूक करणारी अशीच आहे.

    जयंत पाटील यांची कविता जशीच्या तशी

    नेतृत्वात सुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे
    मी एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे
    नव्या युगातही शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार हाच आमचा ध्यास आहे
    मी जातो आहे, पण सोडत नाही
    एक पाऊल मागे घेतलंय, पण उद्दीष्ट्ये अजूनही ठाम आहे
    कालही महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे
    नाव असेल किंवा नसेल
    पण कामातूनच ओळख मिळेल
    कारण मी जयंत आहेहेही वाचा : मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाचा सेनापती बदलला, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा