• Sat. Mar 7th, 2026
    भीमाशंकरच्या जंगलात रिक्षावाल्याने लुटलं, 69 वर्षीय वृद्धाचा आरोप, पुण्यातील प्रकरणात ट्विस्ट

    Pune Old Man Loot Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक पुण्याला आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी रेल्वे स्थानकाच्या बाहेरुन एका रिक्षा चालकाशी भीमाशंकर दर्शनासाठी करार केला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे : भीमाशंकरच्या घनदाट जंगलात रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा आरोप करणाऱ्या दिल्लीतील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून हा प्रकार खोटा असल्याचे समोर आले असून, रिक्षा चालक निर्दोष ठरला आहे.

    नोटीस देऊन सोडले

    या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, चौकशीनंतर पोलिसांनी रिक्षा चालकाला नोटीस देऊन सोडले.

    नेमकं काय घडलं?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक पुण्याला आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी रेल्वे स्थानकाच्या बाहेरुन एका रिक्षा चालकाशी भीमाशंकर दर्शनासाठी करार केला. 15 हजार रुपयांमध्ये दर्शन करून परत येण्याचे ठरले. त्यापैकी 10 हजार रुपये रोख आणि उर्वरित ऑनलाइन स्वरूपात त्यांनी दिले.

    संपर्क साधूनही प्रतिसाद नाही

    ठरल्यानुसार रिक्षा चालक त्यांना घेऊन भीमाशंकरला गेला. संबंधित ज्येष्ठ नागरिक दुपारी मंदिरात गेल्यानंतर ते तीन-चार तास परत आलेच नाहीत. सतत संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने रिक्षा चालक पुण्याकडे निघून आला.

    अखेर बनाव उघड

    चौकशीदरम्यान, रिक्षा चालकाने आपली बाजू स्पष्ट केली. तो घटनास्थळी थांबला होता; पण ज्येष्ठ नागरिक परत न आल्याने तो निघून गेला, असे त्याचे म्हणणे होते. पोलिसांनी दोन्ही बाजूंची पडताळणी केल्यानंतर हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले.

    या खोट्या तक्रारीमुळे पोलिसांची अनाठायी धावपळ झाली. आता या प्रकाराची अधिक चौकशी सुरू असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    दोन मंदिरांतील दानपेट्या फोडल्या

    दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या व लुटमारीच्या घटना वाढत आहे. शहरातील मिल कॉर्नर येथील श्री हनुमान मंदिर ट्रस्टच्या महादेव मंदिरात दानपेटी फोडल्याची घटना घडली. पैठण येथील वडवाळी बालाजी मंदिरातील दानपेटीही फोडण्यात आली.
    Solapur Accident : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या आईला भेटून लेक निघाला, वाटेत काळ आडवा, तरुणाचा अपघातात मृत्यू
    शहरात दानपेटी फोडल्याच्या घटनेत प्रतीक प्रदीप कोल्हे यांनी तक्रार दिली. 12 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजता रुक्मिणीबाई दसपुते मंदिरात पूजा करण्यासाठी आल्या असता त्यांना दानपेटी गायब झाल्याचे आढळले. ती मंदिराच्या मागच्या बाजूस फोडलेली दानपेटी आढळली. पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

    Pune Love Jihad News : FC Raod वरच्या दुकानात Love Jihaad चं रॅकेट, Gopichand Padalkar यांचा दावा

    Pune Crime : ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी देतो, तरुणीला पुण्यात आणलं अन् बुधवार पेठेत नेण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

    बालाजी मंदिरात चोरी

    वडवाळी, ता. पैठण, येथील बालाजी मंदिराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून चोरट्याने दानपेटीतील सुमारे 30 हजार रुपयांची रक्कम चोरली नेली. ही घटना 13 व 14 जुलैच्या मध्यरात्री घडली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा