Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे नाशिकच्या मैदानात
नाशकात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर नाशिकचा गड सावरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय व्यूहरचना या दौऱ्यात निश्चित केली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पक्षाकडून सुरू झाली असून, आज, मंगळवारी (दि.१५) पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
