Mumbai News: कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर ‘सिंदूर’ का?
‘दक्षिण मुंबईतील उड्डाणपुलाला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर कर्नाक यांचे नाव देण्यात आले होते. परंतु इतिहासात नोंद असणारे दाखले पाहता, विशेषत: प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या साताऱ्याच्या इतिहासात उल्लेख आहे की, गव्हर्नर कर्नाक यांच्या काळात छत्रपती प्रतापसिंह महाराज, मुधोजी राजे यांच्यावर अन्याय करण्यात आला. भारतीयांवर गंभीर स्वरूपाचे खोटे आरोप लादण्यात आले. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील अशा काळ्या खुणा पुसण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. त्यामुळे कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर ‘सिंदूर’ असे केले आहे’, असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
