Pune Porsche Car Accident : आई आजारी असल्याने जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज आरोपी विशाल अगरवाल याने केला आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींच्या विरोधात बनावट दस्तावेज तयार करण्यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमे लागू होत नाहीत. त्यामुळे आरोप स्पष्ट होत नाहीत, असा युक्तिवाद बचाव आरोपींच्या वकिलांनी केला.
अपघाताच्या घटनेनंतर कार चालक मुलगा आणि त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशि, मित्तल यांच्याशी संगनमताने शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ‘ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
US Accident : हसऱ्या चेहऱ्यांना दृष्ट लागली! भारतीय कुटुंबाला अमेरिकेत भीषण अपघात, कार पेटल्याने चौघांचा होरपळून अंत
या दहा आरोपींच्या विरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू असून, त्यावर मंगळवारी बचाव पक्षातर्फे ॲड. सुदीप पासबोला, ॲड. हृषीकेश गानू आणि ॲड. राजेश काळे यांनी युक्तिवाद केला. आई आजारी असल्याने जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज आरोपी विशाल अगरवाल याने केला आहे.
Pune News VIDEO : खेळताना 4 वर्षीय चिमुकली खिडकीबाहेर, ग्रिलला लटकली; पुण्यात थरकाप उडवणारी घटना, अखेर…
महाराष्ट्रात राहता अन् मराठी बोलणार नाही म्हणता हे चालणार नाही, पुण्यातील व्यापाऱ्यांनी खडसावलं
भारतीय दंड विधान कलम 109; तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम सात (सार्वजनिक सेवकाकडून लाच स्वीकारण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न) आणि सात अ (सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी अनुचित फायदा घेणे) हे या प्रकरणाला लागू होत नाहीत. बनावट दस्तऐवज तयार करण्यासंबंधीचे आरोपही लागू होत नाहीत, असा युक्तिवाद ॲड. पासबोला यांनी केला. ॲड. गानू आणि ॲड. काळे यांनीही मुद्दे मांडले. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.

