ST Bus Accident News : सावंतवाडी तालुक्यातील बांदा-फुकेरी बस फुकेरीहून बांद्याच्या दिशेने येत होती. त्याचवेळी समोरून उस्मानाबाद-पणजी बस वेगाने येत होती. पानवळ येथे दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. पण…
सावंतवाडी तालुक्यातील बांदा-फुकेरी बस फुकेरीहून बांद्याच्या दिशेने येत होती. त्याचवेळी समोरून उस्मानाबाद-पणजी बस वेगाने येत होती. पानवळ येथे दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. पण, वेगामुळे फुकेरी बसला 100 फूट फरफटत नेले.
Jalna News : आई-वडील पंढरीच्या वारीला अन् लेकासोबत भयंकर घडलं, 33 वर्षांच्या मुलाची बॉडी बघून अख्खं गाव हळहळलं, काय घडलं?
फुकेरी बसमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. “बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सर्व जखमी प्रवाशांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, “जखमी प्रवाशांवर योग्य उपचार केले जात आहेत.” अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
Panvel News : कृपया माझ्या बाळाची काळजी घ्या, भविष्यात मला.. पनवेलला बास्केटमध्ये अर्भक सोडून गेलेली तरुणी सापडली
एसटी बसेसचे वाढते अपघात प्रवाशांमध्ये चिंतेचा विषय बनले आहेत. अशा अपघातांमध्ये निष्पाप प्रवाशांचे प्राण जातात. रस्ता मोकळा दिसला की चालक भरधाव वेगात गाड्या चालवतात. आणि अचानक एखादं वाहन समोर आलं की, वेगावर नियंत्रण मिळवणं कठीण होतं. आणि भीषण अपघात घडतात. रस्ते सुरक्षेविषयी वाहनचालकांमध्ये अधिक जागृती करणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान काल, लातूर जिल्ह्यातील चाकूरजवळ दुपारी साडेतीन वाजता नांदेड-लातूर महामार्गावर अलगरवाडी पाटी येथे भीषण अपघात झाला. पंढरपूरहून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन नांदेडकडे निघालेल्या भाविकांच्या भरधाव कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाला, ज्यात आठ जण जखमी झाले. समोरून येणाऱ्या कार चालकाने प्रसंगावधान राखत कार महामार्गाखाली नेल्याने मोठा अनर्थ टळला.
अपघात टाळण्यासाठी चालकाने कार महामार्गापासून पंधरा फूट खाली नेली आणि एका शेतात थांबवली. अपघात एवढा भीषण होता की, एअर बॅगमुळे कारमधील भाविक थोडक्यात बचावले. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली.

