Father Killed Daughter In Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे एका बापाने आपल्या १० वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या केली.
चौथ्या वर्गातील मुलीला संपवलं
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गौरी ही इयत्ता 4 थी मध्ये शिकत होती. तिचे वडील ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे गौरी तिच्या आजीकडे राहत होती. दारूच्या नशेत ज्ञानेश्वरने मुलीला कुऱ्हाडीने मारले. त्याने त्याच्या आईला (गौरीच्या आजीला) हे कुणालाही सांगू नको, अशी धमकी दिली.गौरीची आजी मंगल जाधव यांनीच तिला वाढवले. त्या म्हणाल्या, गौरी तीन- चा महिन्यांची असतानाच तिची आई तिला सोडून गेली. त्यामुळे गौरीचा सांभाळ तिच्या आजीनेच केला.
गावात एकच हळहळ
Crime Diary: निळ्या ड्रममध्ये बॉडी, 36 तास अन् भयंकर हत्याकांडचा उलगडा; अंगाचा थरकाप उडवणारी घटना
पोलिसांनी सांगितले की, ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याचे नेहमी घरात खटके उडत होते. याच रागातून त्याने हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, तपासानंतरच सत्य समोर येईल.
या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव हादरले आहे. एका बापाने आपल्याच मुलीची हत्या केल्याने समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

