• Sun. Jun 7th, 2026
    घराचं दार उघडताच किंचाळला, डोळ्यापुढे भाऊ…; श्रीकांत कायमचा गेला, जळगावात मन हेलावणारी घटना

    Jalgaon Youth Ends Life: घरात कोणी नसताना एका तरुणाने आपल्या आयुष्याची दोर कापली.. त्याने हा निर्णय का घेतला, याबाबत सध्या काहीही माहिती नाही., मात्र त्याच्या अशाप्रकारे जाण्याने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये जीव देण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. एका दिवसापूर्वी पाचवा तालुक्यात एका शिक्षकांने वर्ग खोलीत आपल्या आयुष्याची अखेर केली होती. तर, आज एका 21 वर्षे तरुणाने राहत्या घरात आपले जीवन संपवले आहे.

    जळगाव शहरापासून जवळ असलेल्या रायपूर कुसुंबा येथे राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरात टोकाचा निर्णय घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना गुरुवारी 26 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास समोर आल्याची माहिती आहे आहे. या तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीकांत मोहन धनगर (वय- 21, रा. रायपूर कुसुंबा ता. जळगाव) असं जीव दिलेल्या तरुणाचे नाव आहे.

    जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा गावात श्रीकांत धनगर हा आई, वडील आणि भाऊ जय यांच्यासोबत वास्तव्याला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला जात होता. गुरुवारी श्रीकांत हा घरी एकटाच होता. त्याचे आई- वडील कामाला गेलेले होते. तर भाऊ जय हा कामानिमित्त बाहेर गेला होता.
    Sonam Raghuvanshi: राजाला ‘या’ तारखेला मारण्याचा होता सोनमचा प्लॅन, आईची धक्कादायक माहिती, उज्जैनचं सिक्रेटही सांगितलंदरम्यान, त्याने एकटा असताना राहत्या घरात गळफास घेत आपल्या आयुष्याची दोर कापली. दुपारी 12 वाजता जेव्हा त्याचा भाऊ जय हा घरी आला, त्यावेळी हा प्रकार उघडकीला आला. जयचा आरडाओरड ऐकून शेजारी जमले. शेजारच्या नागरिकांनी त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता त्याला मयत घोषित केले.

    दरम्यान, श्रीकांतने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबतचे कुठलेही कारण अद्याप समोर आलेले नाही. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात आई उज्वला, वडील मोहन धनगर आणि भाऊ जय असा परिवार आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed