Nashik News : मुंबईहून नाशिकला जाताना अपघातात सुप्रसिद्ध बिल्डरचा मृत्यू
ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक सुनील गणपतराव हेकरे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. मुंबईत कौटुंबिक सोहळा आटपून परत जाताना समृद्धी महामार्गावर कसाऱ्याजवळ त्यांची मर्सिडीज कार उलटून झालेल्या गंभीर अपघातात त्यांना प्राण गमवावे लागले. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
