• Fri. Mar 13th, 2026
    Metro 3 : भूमिगत मेट्रोवर सिद्धिविनायकाची ‘कृपा’, मंदिर दर्शनासाठी प्रवाशांचा राबता

    Siddhivinayak Temple Metro 3 Station : मुंबईतील मेट्रो – ३ चा दुसरा टप्पा सुरू झाल्याने सिद्धिविनायक मंदिराला मेट्रो स्थानक देण्यात आलं आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. ‘वरळी ते मंदिर’ आणि ‘सांताक्रूझ ते मंदिर’ मार्गावर गर्दी आहे. तसंच आचार्य अत्रे चौक ते विमानतळ दरम्यानच्या महसुलात वाढ झाली आहे.

    फोटो सौजन्य – चिन्मय काळे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    चिन्मय काळे, मुंबई : ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्यापासून दहा टक्केदेखील वापरात न येणाऱ्या भूमिगत मेट्रो ३ च्या मार्गात सिद्धिविनायक मंदिर जोडले गेल्याने येथे काही प्रमाणात प्रवासी दिसू लागले आहेत.

    दोन मिनिटांच्या पायी अंतरावर मंदिर –

    या भूमिगत मेट्रोचा दुसरा टप्पा मागील शनिवारी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक स्थानक म्हणजेच वरळी नाक्यामार्गे सुरू झाला. या टप्पात मेट्रो बीकेसीनंतर धारावी, माहीम, दादर, प्रभादेवीमार्गे वरळी नाक्यावर येते. यापैकी प्रभादेवीसाठीचे स्थानक हे सिद्धिविनायक मंदिराखाली आहे. त्यामुळे स्थानकातून बाहेर पडताच जेमतेम दोन मिनिटांच्या पायी प्रवासावर मंदिर आहे.
    Panvel – Karjat : चौपदरी रेल्वेजाळे, कर्जत-पनवेलसाठी नवी मार्गिका; प्रवाशांना मोठा फायदा, मध्य रेल्वेची माहिती

    ‘वरळी ते मंदिर’ व ‘सांताक्रूझ ते मंदिर’ मार्ग लोकप्रिय –

    या मार्गिकेचा पहिला टप्पा आरे जेव्हीएलआर ते बीकेसी असा ऑक्टोबर महिन्यात सुरू झाला. दररोज दोन लाख प्रवाशांकडून मेट्रोचा वापर होणे अपेक्षित असताना सरासरी केवळ २० हजार प्रवाशांची ये-जा असे. त्यामुळेच ही मेट्रो आता सिद्धिविनायक मंदिराच्या निमित्ताने प्रवाशांनी फुललेली दिसते. प्रामुख्याने ‘वरळी ते मंदिर’ व ‘सांताक्रूझ ते मंदिर’ या मार्गावर प्रवासी आसने भरलेली असल्याचे दिसते.
    Masjid Bunder : मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार; उंच डेक बांधण्याची योजना, काय होणार बदल?
    Metro 3 : भूमिगत मेट्रो स्थानक नेमकं कुठे आहे? शोधणं आता सोपं होणार, प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सोईसाठी महत्त्वाची सुविधा

    महसूलही वाढला –

    सध्या या मार्गिकेवर आचार्य अत्रे चौक स्थानक ते सिद्धिविनायक मंदिरादरम्यान दररोज ३०० ते ४०० प्रवाशांची ये-जा आहे. आचार्य अत्रे चौक स्थानक ते विमानतळ टर्मिनल २ (पहिल्या टप्प्यातील स्थानक) यादरम्यान दररोज सरासरी ८० हजार रुपयांचा महसूल जमा होत आहे. हा आकडा दुसरा टप्पा सुरू होण्याआधी ५० हजार रुपयांहून कमी होता, असे प्रत्यक्ष भेटीवेळी संबंधितांशी चर्चा केली असता समजले.

    Metro 3 साठी दोन लाख प्रवाशांची अपेक्षा, पण २० हजार प्रवासीच, आता मात्र भूमिगत मेट्रोवर सिद्धिविनायकाची ‘कृपा’

    प्रवासी म्हणतात…

    नितीन माहेश्वरी यांना आत्तापर्यंत सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी बस किंवा रिक्षा, लोकल व पुन्हा बस, दोन-तीन प्रकारच्या वाहतुकीचा वापर करावा लागत होता. ‘कांजुर येथून बेस्टची ४९२ क्रमांकाची बस थेट आरे जेव्हीएलआर स्थानकावर सोडते. तिथून भूमिगत मेट्रोने जेमतेम अर्धा तास ते ३५ मिनिटांत आम्ही मंदिरात पोहोचू शकतो. आधी यासाठी दोन ते अडीच तास लागत होते’, असे त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed