Chhatrapati Cooperative Sugar Factory Election Result Update : बारामतीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. ‘श्री जय भवानी माता’ पॅनलचे उमेदवार सुरुवातीपासून आघाडीवर होते. पृथ्वीराज जाचक आणि शरद जामदार यांनी प्रतिस्पर्धी पॅनलवर मोठी आघाडी घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या निवडणुकीकडे लक्ष होते. मतदानाच्या दिवशी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात खटके उडाले. आज निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत श्री जय भवानी माता पॅनल प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वास यावेळी गुजर यांनी व्यक्त केला. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नव्या राजकारणातील सहकाराच्या वर्चस्वाची कसोटी पाहणारी ही निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. छत्रपती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीचे संयुक्त ‘श्री जय भवानी माता पॅनल’ निर्णायक आघाडीवर आहे. या पॅनलचे पहिल्या गटातील सर्व उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत.
Ajit Pawar : कारखान्याच्या मतदानावेळी पवार-पाटील समोरासमोर; दादा म्हणाले, पाटील साहेब लक्ष असू द्या, हर्षवर्धन पाटलांकडून कडक रिप्लाय
दादांचा जोरदार प्रचार
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचे मतदान रविवारी १८ मे ला पार पडले होते. आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत निकालाची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशी ळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील समोरासमोर आले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या होत्या.
Indapur Chhatrapati Sugar Factory Election : इंदापूरच्या छत्रपती सहकारी कारखान्यात दादांचा पॅनेल आघाडीवर, निकालाचा कौल कुणाला?
अजित दादा पाटील त्यांना खास शैलीमध्ये पाटील साहेब नमस्ते, लक्ष असूद्य आमच्याकडे असा म्हणाले होते. यावर पाटलांनीही आमचंं लक्ष तुमच्याकडेच असल्याचं म्हणत पाटलांनीही कडक उत्तर दिले होते. दोघांनी मारलेल्या कोपरखळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आज निकाल स्पष्ट होणार असून रात्री कोणता पॅनल बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

