Solapur News : सोलापूर जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. बार्शी तालुक्यातील पाथरी गावात न्यायाधीशांच्या घरी चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी किचनचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील २० तोळे सोने आणि ५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. न्यायाधीश कोल्हापूरला देवदर्शनासाठी गेले होते. बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.
न्यायाधीश देवदर्शनास कोल्हापूरला गेले असता चोरट्यांनी मारला डल्ला
चोरट्यांनी न्यायाधिशांच्या घरातील ज्वारीच्या कोट्यातून जवळपास 20 तोळे सोने आणि 5 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायाधीश हे देवदर्शनास कोल्हापूरला गेले असता ही घटना घडली आहे. बार्शी ग्रामीण पोलीस या चोरीचा कसून तपास करत आहेत. न्यायाधीश महोदयांच्या घरी चोरी झाल्याने सोलापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
Solapur Crime: बस स्टँडवरून ३ वर्षीय मुलीला पळवले, दागिने लुटून १०० किमी अंतरावर सोडलं; एक धागा महत्त्वाचा ठरला अन्…वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात न्यायदंडाधिकारी
पाथरी येथील दिनेश गायकवाड हे सध्या वाशिम तालुक्यातील रिसोड येथे न्यायदंडाधिकारी आहेत. सुट्टीनिमित्ताने न्यायदंडाधिकारी गावी आले होते. धार्मिक कार्यक्रमनिमित्ताने ते कोल्हापूर दर्शनासाठी गेले असता, त्यांच्या घरात चोरीची घटना घडली. याबाबत, त्यांच्या आई पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चोराचं भलतंच धाडस, थेट न्यायाधीशाच्या घरी मारला डल्ला; तब्बल २० तोळं सोन्यासह रोकडही पळवली, सोलापुरात खळबळ
सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 12 लाख 23 हजार रुपये आणि 5 हजार रोकड चोरीला
बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 12 लाख 23 हजार रुपये आणि 5 हजार रोकड लंपास केले आहे, अशी नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. मात्र, चक्क न्यायाधिशांच्या घरी चोरीची घटना घडल्याने चर्चांना उधाण आले. या चोरी प्रकरणात पोलिस तपास करत आहेत. सोलापूरमध्ये चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिस चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळणार हा प्रश्न देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

