• Thu. Mar 12th, 2026

    मारणे टोळीला पुणे पोलिसांचा आणखी एक दणका, आलिशान गाड्या जप्त

    ByMH LIVE NEWS

    May 17, 2025
    मारणे टोळीला पुणे पोलिसांचा आणखी एक दणका, आलिशान गाड्या जप्त

    Pune Crime Action Against Gaja Marne : कुख्यात गुंड गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीच्या १० ते १५ गाड्या जप्त केल्या आहेत. मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणे याच्यासाह त्याच्या टोळीतील इतर सदस्यांच्या गाड्या जप्त केल्या आल्या आहेत.

    (फोटो– Lipi)

    अभिजीत दराडे, पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीच्या १० ते १५ गाड्या जप्त केल्या आहेत. मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणे याच्यासाह त्याच्या टोळीतील इतर सदस्यांच्या गाड्या जप्त केल्या आल्या आहेत. यामध्ये २ टोयोटा फॉर्च्यूनर, एक महिंद्रा थार, एक टाटा नेक्सन यासह आणखी ४ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेकडून टोळीतील सदस्यांच्या दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत पुणे पोलिसांनी १० ते १५ गाड्या जप्त केल्या आहेत.

    काही दिवसांपूर्वी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला कोथरूडमध्ये मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर गजा मारणेवर मोक्का लावण्यात आला होता. मोक्का लावल्यानंतर गजा मारणे याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं मात्र त्यानंतर त्याला सांगलीला रवाना करण्याचा निर्णय घेतला. गजा मारणेला पुण्याहून सांगलीला घेऊन जात असताना कणसे ढाब्यावर पोलिसांची मटण पार्टी झाली होती. याची भनक पुणे पोलीस आयुक्त नितेश कुमार यांना लागताच याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. इतकंच नाही तर कणसे धाब्यावर गजा मारणे याला भेटायला आलेल्या तीन जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    त्यानंतर आता गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांनी आणखी एक दणका दिला आहे. पोलिसांनी मारणेच्या दुचाकीसह आलिशान चारीचाकी गाड्यांचाही समावेश आहे. २ टोयोटा फॉर्च्यूनर, एक महिंद्रा थार, एक टाटा नेक्सन यासह आणखी ४ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेकडून टोळीतील सदस्यांच्या दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed