• Mon. Jun 29th, 2026

    उद्योजक राजदीप खाणगावकर यांचा भाजपामध्ये प्रवेश

    ByMH LIVE NEWS

    May 17, 2025
    उद्योजक राजदीप खाणगावकर यांचा भाजपामध्ये प्रवेश


    ठाणे-प्रतिनिधी

    भारतीय जनता पार्टी या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विकासात्मक धोरणावर वाटचालक करणार्‍या पक्षात विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रवेश करीत आहेत. हेच धोरण अवलंबत ठाण्यातील काजुवाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजदीप खाणगावकर यांनी भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. काजुवाडी या विभागात सामाजिक कार्य सुरू असून या भागातील नागरिकांचाही त्यांना चांगला पाठिंबा लाभत आहे.

    भारतीय जनता पक्षाचे काजुवाडी,वैतीनगर, रामचंद्रनगर भागात राजकीय तथा सामाजिक क्षेत्रात चांगले योगदान आहे.येथील जनतेच्या समस्या अधिक तीव्रतेने सोडविण्यासाठी भाजपा हाच पर्याय असल्याने राजदीप खाणगावकर यांनी आमदार अ‍ॅड.निरंजन डावखरे,ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, रमेश आंब्रे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed