• Sat. Jun 13th, 2026

    काँग्रेसला पुण्यामध्ये आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, बड्या नेत्याची अजितदादांसोबत भेट, चर्चांना उधाण

    ByMH LIVE NEWS

    May 17, 2025
    काँग्रेसला पुण्यामध्ये आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, बड्या नेत्याची अजितदादांसोबत भेट, चर्चांना उधाण

    Pune Congress : पुण्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. पुण्याचे काँग्रेस नेते दत्ता बहिरट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. बहिरट राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.

    (फोटो– Lipi)

    अभिजीत दराडे, पुणे : पुण्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. पुण्याचे काँग्रेस नेते (Pune Congress) दत्ता बहिरट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेत त्यांनी चर्चा केली आहे. अजित पवारांच्या भेटीनंतर बहिरट राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.

    दत्ता बहिरट हे पुण्याचे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. बहिरट यांनी २०१९ आणि २०२४ साली काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. पण ते निवडून आले नाहीत. मात्र दत्ता बहिरट यांचं शिवाजीनगर मतदार संघामध्ये मोठं वजन आहे. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तोटा होऊ शकतो.

    महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना दत्ता बहिरट म्हणाले, ‘माझ्या नातेवाईकांच्या घरी अजितदादा आले होते. तेव्हा मला जेवण्याचे निमंत्रण होते, तिथे मी गेलो होतो, तिथेच अजित दादांची भेट झाली. मात्र पक्ष प्रवेशाबाबत अद्याप तरी काही निर्णय झालेला नाही.’

    गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. रवींद्र धंगेकर यांच्यानंतर काँग्रेसचे बडे आणि जेष्ठ नेते दत्ता बहिरट यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे काँग्रेसला पुण्यामध्ये आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामध्येच पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. काही नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर स्वपक्षाला धक्का देत दुसऱ्या पक्षांची वाट धरली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे काँग्रेसमधूनही अनेक जणांनी वेगळी वाट धरली आहे. यामध्येच बहिरट हे देखील पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed