• Sun. Jun 14th, 2026

    तुला जिवंत सोडणार नाही… मुलाला धमकी अन् काही वेळातच भयंकर घडलं

    तुला जिवंत सोडणार नाही… मुलाला धमकी अन् काही वेळातच भयंकर घडलं

    Edited byशितल मुंढे | Contributed by प्रशांत श्रीमंदिलकर | Lipi | Updated: 12 May 2025, 5:49 pm

    Pune Crime News : पुण्यातील दिघी परिसरात धक्कादायक घटना घडली. जुन्या भांडणाच्या वादातून आरोपींनी कोयत्याने वार केले. दिघी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपी आणि मृतांमध्ये पूर्वी वाद होता. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    (फोटो– Lipi)

    प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : पुण्यातील दिघी परिसरात एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडलीये. या घटनेनंतर नागरिकांमध्ये एक भितीचे वातावरण बघायला मिळत आहे. दिघी परिसरात रविवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास जुन्या भांडणाच्या वादातून एका १७ वर्षीय मुलाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. सपासपा वार आरोपींनी त्याच्यावर केले आणि त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

    दिघीतील घटनेने नागरिकांमध्ये दहशत पोलिसांनी केले मोठे आवाहन

    सोहम सचिन शिंदे (वय १७) राहणार माऊली नगर कॉलनी साईदीप बिल्डिंग, दिघी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी दिघी पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम हा वडमुखवाडी येथील साई मंदिराजवळील केकिज शॉपीसमोर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता.
    Pune News : पुण्यात HSRP नंबर प्लेट बसवताना मोठा घोळ, एकाच गाडीसाठी दोन वेगळे नंबरतुला जिवंत सोडणार नाही म्हणत आरोपींनी केले सपासप वार

    यावेळी आरोपी नामदेव उर्फ निलेश शिंदे, शुभम पोखरकर आणि सुमित शिंदे यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून सोहम याच्याशी वाद घातला. हा वाद इतका वाढला की, थेट आरोपींनी सोहमला शिवीगाळ करत तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आणि कोयत्याने त्याच्या डोक्यावर, छातीवर, पाठीवर आणि इतर भागांवर सपासप वार केले आणि त्याचा खून केला.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव आणि..

    घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले. सध्या पोलिसांकडून या हत्येचा तपास केला जातोय. माहितीनुसार, आरोपी आणि मृतक यांच्यात पूर्वी वाद होता आणि याच वादावरून त्याचा खून करण्यात आला, अशी प्राथामिक माहिती आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यादरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी तात्काळ या खून प्रकरणातील आरोपींना अटक केली.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed