Sanjay Raut : भारत-पाकिस्तान युद्धाला पुर्णविराम मिळाला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत हे युद्ध थांबवलं. पण पाकिस्तानने रात्री लगेच एक तासाभरानंतर हल्ला चढवला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी अमित शहा यांचा राजीनामा मागितला आहे.
अमेरिकेच्या पापाने हे युद्ध का थांबवलं? हा त्यांचा पापा असेल या देशाचा पापा नाही. तुम्ही पापा घेत बसा पण देशाची बेअब्रू झाली, भावना दुखावलेल्या आहेत. २६ महिलांचे सिंदूर पुसले ते अतेरिकी कुठे आहेत. मी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं. जोपर्यंत सहा अतिरेक्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर होत नाही. कुठे आहेत ते नेमके कोणी गुडघे टेकलेत असा सवाल करत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तान राहिलं नसतं. १९७१ साली पाकिस्तान कुठे राहिलं होतं. पाकिस्तानचे दोन तुकडे करून दोन राष्ट्र निर्माण केले. त्यावेळी ९०-९२ हजार सैन्य आम्ही पाहिलं आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि राजीव गांधी यांच्यावरती घाणेरड्या भाषेत टीका करायची. यांच्या पायाचे तीर्थ पिण्याची लायकी नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारले.

