• Sat. Aug 8th, 2026

    महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजवंदन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 1, 2025
    महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजवंदन – महासंवाद




    मुंबई, दि. ०१: महाराष्ट्र राज्य 66 व्या स्थापना दिनानिमित्त विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला.

    यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य प्राप्त झालेल्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी अभिवादन केले.

    सभापती प्रा.शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा, यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे. राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या  गोळीबारात मृत्यमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

    ध्वजवंदन सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डॉ.विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठ्ये, सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवी, सह सचिव नागनाथ थिटे, उप सचिव सुभाष नलावडे यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ आणि राखीव पोलीस उपनिरीक्षक अरुणा जॉन्सन बुरकेन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

    ०००

     







    Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळीमा! चारित्र्यावर संशय, संगनमत करुन सासरच्यांसह पतीने गरोदर बायकोला डेटॉल पाजलं
    सापss सापss लेडीज डब्यात कल्लोळ, चेन खेचल्याने लोकल चारवेळा थांबली, कुर्ल्यात सर्व महिलांना खाली उतरवून तपासणी, शेवटी अफवा निघाली
    Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed