Bharat Gogawale on Aditi Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. आदिती तटकरे यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध आहे, तर भरत गोगावले यांनी या पदावर दावा केला आहे. महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असले, तरी झेंडावंदनाचा अधिकार म्हणजे पालकमंत्रिपद नव्हे, असे म्हणत भरत गोगावले यांनी म्हटले.
भरत गोगावले यांनी परत केला पालकमंत्रिपदाबद्दल मोठा दावा
अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाहीये. रागयडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, याला शिवसेनेने विरोध केला. भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी दावा करत आहेत. यादरम्यान सध्या रायगडचे पालकमंत्रिपद हे कोणाकडेही नाहीये. भरत गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्रिपद आपल्याला मिळणार असे यापूर्वी म्हटले होते.
Maharashtra Cabinet Decisions : पीक विमा योजनेत बदल, तर काही इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी, मंत्रिमंडळ बैठकीत 11 मोठे निर्णयआदिती तटकरेंना लगावला भरत गोगावले यांनी टोला
आता महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजावंदन होणार आहे. आता याबद्दलच बोलताना भरत गोगावले हे दिसले. भरत गोगावले म्हणाले की, झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्रिपद दिलं असं नाही, असे म्हणत त्यांनी थेट आदिती तटकरे यांना टोला लगावला. रायगडचे पालकमंत्रिपद आम्हालाच मिळेल, म्हणताना परत एकदा भरत गोगावले हे दिसले आहेत. भरत गोगावले यांनी आदिती तटकरेंना टोला लगावलाय.
भरत गोगावलेंचा आदिती तटकरेंना टोला, म्हणाले, झेडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे…
आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू
भरत गोगावले म्हणाले की, जे काही दिलेले आहे ते दिले आहे. आम्हाला पण आमदारांना तालुक्यात निमंत्रण दिले आहे. जिल्हांचे त्यांना दिलेले आहे. झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्रिपद दिले अशातला भाग नाहीये. मागच्यावेळी पण २६ जानेवारीला आणि १५ ऑगस्टला पण दिले होते, म्हणून कदाचित यावेळीही दिले असावे. मी अजून तलवार म्यान केली नाही, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

