• Sat. Mar 7th, 2026

    मोठी बातमी! डॉक्टर वळसंगकरांनी जीव दिल्यानंतर रात्री उशिरा सूनेचा मनीषा मानेला फोन

    ByMH LIVE NEWS

    Apr 29, 2025 #breaking news Solapur, #Crime, #crime batmya, #crime news marathi, #daughter-in-law questioned, #DNB neurosurgeon questioned, #doctor family conflict, #doctor mental health, #doctor suicide mystery, #Dr. Shirish Valsangkar suicide, #Dr. Sonali Valsangkar, #family claims harassment, #harassment in medical field, #high-profile suicide, #Latest Marathi News, #Maharashtra doctor suicide, #Maharashtra News, #Manisha Mane arrest, #medical community reaction, #mental harassment case, #mental torture case, #neurosurgeon suicide case, #police interrogation updates, #police investigation Solapur, #police statement Solapur, #psychological abuse case, #Shirish Valsangkar wife, #solapur, #solapur city, #solapur crime news, #Solapur doctor suicide, #Solapur neurosurgeon news, #Solapur News Update, #suicide due to torture, #suicide note investigation, #suspicious suicide case, #tragic doctor suicide, #आत्महत्या चिठ्ठी तपास, #कुटुंबाचा छळाचा आरोप, #छळामुळे आत्महत्या, #डीएनबी न्यूरोसर्जन चौकशी, #डॉ. वळसंगकर पत्नी, #डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण, #डॉ. शोनाली वळसंगकर, #डॉक्टर आत्महत्या मिस्ट्री, #डॉक्टर कुटुंबातील वाद, #डॉक्टर मानसिक आरोग्य, #दु:खद डॉक्टर आत्महत्या, #न्यूरोसर्जन आत्महत्या प्रकरण, #पोलिस चौकशी अपडेट, #पोलिस चौकशी सोलापूर, #पोलिस तपास सोलापूर, #प्रसिद्ध डॉक्टर आत्महत्या, #मनीषा माने अटक, #मराठी बातम्या, #महाराष्ट्र टाइम्स marathi news, #महाराष्ट्र डॉक्टर आत्महत्या, #महाराष्ट्र बातम्या, #मानसिक छळ प्रकरण, #मानसिक त्रास प्रकरण, #वैद्यकीय क्षेत्र प्रतिक्रिया, #वैद्यकीय क्षेत्रात छळ, #शिरीष वळसंगकर कोण, #संशयास्पद आत्महत्या, #सून डॉ. शोनाली, #सोलापूर गुन्हा बातमी, #सोलापूर डॉक्टर आत्महत्या, #सोलापूर न्यूरोफिजिशियन बातमी, #सोलापूर ब्रेकिंग न्यूज
    मोठी बातमी! डॉक्टर वळसंगकरांनी जीव दिल्यानंतर रात्री उशिरा सूनेचा मनीषा मानेला फोन

    Dr. Shirish Valsangkar Death Case: डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्ररकणी आता नवी आणि मोठी माहिती समोर आली आहे. ज्या दिवशी वळसंगकरांनी आपला जीव दिला त्याच दिवशी सून डॉ. शोनालीने मनीषा मानेला फोन केला होता.

    (फोटो– Lipi)

    इरफान शेख, सोलापूर: डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूला जवळपास पंधरा दिवस होत आले आहेत. एसपी न्यूरोसायन्स या रुग्णालयातील महिला कर्मचारी मनीषा मुसळे मानेला पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरु आहे. मनीषा मानेच्या मोबाईल फोनचा तपास सुरू आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेतली होती. त्याच रात्री उशिरा सून डॉ. शोनाली आणि मनीषा माने या दोघांत फोन वरून चर्चा झाली होती. सून डॉ. शोनालीने केलेला कॉल मनीषा मानेने रिकॉर्ड केला होता. याबाबत एका स्थानिक वृत्तपत्राने माहिती प्रसारित केली आहे.

    डॉ. शोनाली आणि मनीषा या दोघांत काय संभाषण झालं?

    अश्विन आणि सासू उमा यांना केलेला ई-मेल तू सासऱ्यांनाही केला होता का? तू असं का केलीस? तुझ्यामुळे सासऱ्यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली. तुला काय कमी पडले होते, तू एवढ्या स्तराला गेली? असे विचारले. मनीषा उत्तर देण्याआधीच कॉल कट केला. पण, मनीषा यांनी हा कॉल रेकॉर्ड केला होता. मनीषाच्या मोबाईलमध्ये इतर कॉल रेकॉर्ड नाहीत, पण हा एवढाच कॉल रेकॉर्ड आढळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले
    Shirish Valsangkar Death: जीव देण्यापूर्वी डॉ. वळसंगकरांचे चौघांना फोन, CDRमध्ये धक्कादायक माहिती, प्रकरणाला मिळणार वेगळं वळण?

    डॉक्टरांचं मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं

    यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्यावर त्यांना तातडीने एसपी न्यूरोसायन्स या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतरही डॉ. शिरीष वळसंगकर वाचू शकले नाहीत. डॉ. शिरीष यांना 18 एप्रिल रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास मृत घोषित करण्यात आले. गंभीर घटना असताना रुग्णालयासमोर जमा झालेल्या गर्दीला तेथेच अंत्यदर्शन खुले करण्यात आले होते.

    शनिवारी रात्री रुग्णालयातील महिला कर्मचारी मनीषाला अटक

    डॉ. शिरीष यांच्यावर उपचार करताना त्यांचे कपडे फाडून काढले होते. पोलिसांनी डॉक्टरांचे कपडे ताब्यात घेतले आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १९) सकाळी त्यांच्या कपड्याची तपासणी करताना डॉक्टरांच्या पॅन्टच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट आढळली. डॉक्टरांची पत्नी डॉ. उमा यांना ती सुसाईड नोट दाखविण्यात आली. सुसाईड नोटवरून पोलिसांनी मनीषाला मुख्य संशयित आरोपी म्हणून शनिवारी रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरातून अटक केली होती. पोलिसांनी तपास कोणत्या दिशेने जाणार आणखीन मोठे मासे गळाला लागणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed