• Tue. Sep 22nd, 2026
UPSC मध्ये लेकीचं लख्ख यश, मात्र पेढे वाटतानाच वडिलांना काळाने घेरले; हार्टअटॅकमुळे मायेचे छत्र हरपले

Yavatmal News UPSC Ranked Student : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी लख्ख यश मिळवले आहे. पण यवतमाळमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. लेकीने UPSC परिक्षेत बाजी मारल्याचे समजताच वडि‍लांनी पेढे वाटण्यास सुरुवात केली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)

यवतमाळ : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेकांनी लख्ख यश मिळवले आहे. यशस्वी तरुणांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण यवतमाळमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. आपल्या लेकीने UPSC परिक्षेत बाजी मारल्याचे समजताच वडि‍लांनी पेढे वाटण्यास सुरुवात केली, पण काळाने त्यांना त्याचक्षणी घेरले आणि त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी अंत झाला आहे. प्रल्हाद खंदारे असे मृत वडिलांचे नाव आहे. या घटनेने खंदारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मोहिनी खंदारे या तरुणीने युपीएससी परिक्षेत चांगली रँक मिळवली आणि त्यामुळे कुटुंबीयांना अभिमान वाटत आहे. पण यातच पेढे वाटप करणाऱ्या वडिलांचं निधन झाल्याने मोहिनीच्या या यशाचा आनंद अल्पकालीन ठरला आहे. वडिलांचं छत्र हरपल्याचे दु:ख मोहिनीला आयुष्यभरासाठी गाठी पडले आहे.
Pune News : मुख्यमंत्र्यांचा एक फोन अन् पहलगाम हल्ल्यात प्राण गमावणारे संतोष जगदाळे यांच्या कन्येला नोकरी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मोहिनी खंदारेने ८८४ वा रँक पटकावला आहे. प्रशासकीय अधिकारी होण्याचे मोहिनीचे स्वप्न पूर्ण होणार या सुखद बातमीने वडिल सुखावले आणि त्यांनी गावभर पेढे वाटण्यास सुरुवात केली. पण याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. मुलीच्या स्वप्नपूर्तीचा आनंद साजरा करताना बापावर काळाचा घाला पडला आणि क्षणार्धात आनंदाचा क्षण दु:खात बुडाला आहे. प्रल्हाद खंदारे हे बुलढाण्यातील पुसद पंचायत समिती येथे ते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते. त्यांच्या मृत्यूने कुटुंबासह साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे.

प्रल्हाद खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते. त्यांनी आपल्या लेकीच्या उच्च शिक्षणासाठी मेहनत घेतली. लेक मोहिनीने देखील वडिलांच्या कष्टाचे चीज केले आणि युपीएससी परिक्षेत चांगली रँक मिळवली. पण आनंदोत्सव साजरा करतानाच त्यांच्या आनंदात विरजण पडले आणि सारेच शोकसागरात बु़डाले आहेत.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed