• Thu. Mar 12th, 2026

    मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट

    ByMH LIVE NEWS

    Apr 25, 2025 #breaking news Solapur, #Crime, #crime batmya, #crime news marathi, #daughter-in-law questioned, #DNB neurosurgeon questioned, #doctor family conflict, #doctor mental health, #doctor suicide mystery, #Dr. Shirish Valsangkar suicide, #Dr. Sonali Valsangkar, #family claims harassment, #harassment in medical field, #high-profile suicide, #Latest Marathi News, #Maharashtra doctor suicide, #Maharashtra News, #Manisha Mane arrest, #medical community reaction, #mental harassment case, #mental torture case, #neurosurgeon suicide case, #police interrogation updates, #police investigation Solapur, #police statement Solapur, #psychological abuse case, #Shirish Valsangkar wife, #solapur, #solapur city, #solapur crime news, #Solapur doctor suicide, #Solapur neurosurgeon news, #Solapur News Update, #suicide due to torture, #suicide note investigation, #suspicious suicide case, #tragic doctor suicide, #आत्महत्या चिठ्ठी तपास, #कुटुंबाचा छळाचा आरोप, #छळामुळे आत्महत्या, #डीएनबी न्यूरोसर्जन चौकशी, #डॉ. वळसंगकर पत्नी, #डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण, #डॉ. शोनाली वळसंगकर, #डॉक्टर आत्महत्या मिस्ट्री, #डॉक्टर कुटुंबातील वाद, #डॉक्टर मानसिक आरोग्य, #दु:खद डॉक्टर आत्महत्या, #न्यूरोसर्जन आत्महत्या प्रकरण, #पोलिस चौकशी अपडेट, #पोलिस चौकशी सोलापूर, #पोलिस तपास सोलापूर, #प्रसिद्ध डॉक्टर आत्महत्या, #मनीषा माने अटक, #मराठी बातम्या, #महाराष्ट्र टाइम्स marathi news, #महाराष्ट्र डॉक्टर आत्महत्या, #महाराष्ट्र बातम्या, #मानसिक छळ प्रकरण, #मानसिक त्रास प्रकरण, #वैद्यकीय क्षेत्र प्रतिक्रिया, #वैद्यकीय क्षेत्रात छळ, #शिरीष वळसंगकर कोण, #संशयास्पद आत्महत्या, #सून डॉ. शोनाली, #सोलापूर गुन्हा बातमी, #सोलापूर डॉक्टर आत्महत्या, #सोलापूर न्यूरोफिजिशियन बातमी, #सोलापूर ब्रेकिंग न्यूज
    मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट

    Dr. Shirish Valsangkar Death Case: न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणातील संशयीत आरोपी मनीषा मुसळे माने यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

    (फोटो– Lipi)

    इऱफान शेख, सोलापूर: सोलापूर व राज्यातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात महत्वाची घडामोड झाली आहे. डॉ. वळसंगकरांना त्रास देत त्यांना मेल करणारी महिला संशयीत आरोपी मनीषा मुसळे माने यांची शुक्रवारी पोलीस कोठडी संपली होती. शुक्रवारी 25 एप्रिलला पुन्हा एकदा कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने मनीषा मुसळे माने यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. परंतु, भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार पोलिसांनी कोर्टात एक मागणी केली आहे.

    सध्या न्यायालयीन कोठडीत ठीक आहे, परंतु तपासासाठी गरज पडल्यास पुन्हा एकदा पोलीस कोठडी द्यावी. संशयीत आरोपी महिला कर्मचारी मनीषा मुसळे माने यांच्या वकिलांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना स्पष्ट सांगितले की, खऱ्या बाबी अजूनही कोर्टात सादर केल्या गेल्या नाहीत, गृहकलहाची बाब कोर्टात समोर आलीच नाही. एका ईमेलवरून डॉक्टर शिरीष वळसंगकर आपला जीव देणार नाहीत, असे ऍड. प्रशांत नवगिरे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे
    Shirish Valsangkar : मनीषा मानेंना दीड लाख पगार, डॉ. वळसंगकरांना कशाला त्रास देईल? वकिलांनी चिठ्ठीचा मुद्दा काढला

    मनीषाच्या विरोधात वळसंगकर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तक्रारी मांडल्या

    ऍड प्रशांत नवगिरे यांनी माहिती देताना सांगितले, मनीषा मुसळे माने या 2008 पासून एसपी न्यूरोसायन्स म्हणजेच वळसंगकर रुग्णालयात कार्यरत होत्या. मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात रुग्णालयातील 27 कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोर लेखी जबाब दिला आहे. ऍड प्रशांत नवगिरे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. मनीषा माने यांचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्रास होता, तर त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर न करता प्रमुख डॉक्टर कसे काय असं काही करू शकतात करतात असा सवाल ऍड प्रशांत नवंगिरे यांनी उपस्थित केला आहे .पोलिस प्रशासन ज्या वेळी संपूर्ण दोषारोप पत्र दाखल करतील त्यावेळी आम्ही जोरदार युक्तिवाद करू असेही ऍड प्रशांत नवंगिरे यांनी माध्यमांसमोर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

    मनीषा मुसळे मानें हिने माफीनामा लिहिला होता

    एसपी न्यूरोसायन्स रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी व सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेली मनीषा मुसळे माने यांनी डॉ शिरीष वळसंगकर (न्यूरोफिजिशियन) यांना एक मेल केला होता. त्या मेलची दखल घेत डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री राहत्या घरी मोदी या ठिकाणी स्वतःच्या डोक्यात पिस्तुलमधून गोळी झाडून आपल्या आयुष्याची अखेर केली होती. डॉ. वळसंगकर यांनी ज्या रात्री आपला जीव दिला, त्याच दिवशी मनीषा मुसळे माने यांनी डॉक्टरांना माफीनामा लिहून दिला होता, अशी महत्वपूर्ण माहिती ऍड प्रशांत नवंगिरे यांनी दिली आहे. पोलिसांनी दोषारोप पत्र सादर केल्यानंतर, युक्तिवाद करताना सर्व बाबी समोर येतील असेही नवंगिरे यांनी सांगितले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed