• Fri. Sep 18th, 2026

आई निरक्षर पण लेकासाठी झिजली, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षय मुंडे UPSC उत्तीर्ण

आई निरक्षर पण लेकासाठी झिजली, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षय मुंडे UPSC उत्तीर्ण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2025, 2:52 pm

बीडच्या परळी येथील अतिशय सामान्य कुटुंबातला अक्षय मुंडे.. आई अशिक्षित… वडिलांचे छत्र हरपलेलं…पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षयनं जिद्दीनं यूपीएसी परीक्षा उतीर्ण केलीये. निरक्षर आईनेच यूपीएससीचा रस्ता दाखवला आणि अक्षयनं आईच्या कष्टाचं चीज केलंय. कोणतेही क्लास न लावता यूपीएससी परीक्षेत देशात ६९९व्या रॅंकने अक्षय मुंडे उत्तीर्ण झालाय.अक्षय मुंडे यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले या यशाबद्दल बीडच्या पांगरी येथील ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. अक्षयसोबत त्याच्या आईलाही फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed