• Mon. Mar 9th, 2026
    काश्मीरमधील पर्यटक आता सुखरुप राज्यात परतणार, पहलगाम हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट

    CM Devendra Fadnavis Tweet over Pahalgam Attack : पहलगाममधील हल्ल्यात २८ पर्यटकांचा करुण अंत झाला आहे, ज्यामध्ये राज्यातील ६ जणांचा समावेश आहे. तर काही पर्यटक अद्यापही काश्मीरमध्येच अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २८ पर्यटकांचा करुण अंत झाला आहे, ज्यामध्ये राज्यातील ६ जणांचा समावेश आहे. तर काही पर्यटक अद्यापही काश्मीरमध्येच अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अधिकृत एक्स हँडलवर ट्विट करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. पहिल्या फळीत ८३ नागरिकांना परत आणण्यात येणार आहे. तर उर्वरित नागरिकांना दुसऱ्या विमानाचीही व्यवस्था होणार असल्याचे सांगण्यात आले.

    ट्विटमध्ये नमूद करण्यात आले की, मुख्यमंत्र्यांनी काश्मिरमधील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर, उद्या दि. २४ एप्रिल २०२५ रोजी श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना घेऊन मुंबईत येणार आहे. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडण्यात आली आहे.

    ट्विटमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, ‘उद्यासाठीच आणखी एक विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठीच्या प्रवाशांची यादी सुद्धा तयार होत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य सरकार करणार आहे.’

    दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकून पडलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेची मदत पथक काल श्रीनगरला रवाना झाले होते. यातच आज स्वतः उपमुख्यमंत्री एकनाख शिंदेही जम्मू आणि काश्मीरला गेले आहेत. यामुळे मदतकार्याला हातभार लागणार असल्याचे शिंदेंनी म्हटले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed