Nalasopara Crime News : नालासोपाऱ्यात अल्पवयीन भावाने बहिणीला संपवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मिथुन शर्मा हे त्यांची पत्नी, तेरा वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी अंजली असे कुटुंब नालासोपारा पूर्व परिसरात असलेल्या संतोष भुवन येथे पांडुरंग चाळ येथे वास्तव्यास आहे. गुरुवारी शर्मा दांपत्य नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना त्यांचा मोठा मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. तो खेळून घरी परतल्यानंतर त्याची लहान बहीण स्वयंपाक घरातील स्टूलवर खाली पडल्याचे त्याने त्यांच्या शेजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर याबाबतची माहिती तिच्या आई- वडिलांना देण्यात आली आणि तातडीने अंजलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तेथे तिला मृत घोषित केले.
Pune News : कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?
स्वयंपाक घरात स्टूलवरून बहीण खाली पडून जखमी झाली असे तेरा वर्षाच्या भावाने सांगितले, त्याप्रमाणे मृत मुलीच्या वडिलांनी पेल्हार पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Solapur News : न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी संपवलं आयुष्य, राहत्या घरात स्वत:वर गोळ्या झाडल्या; सोलापुरात खळबळमृत अंजलीच्या गळ्याला उजव्या बाजूस जखम असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणी दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे मृत अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अंजलीचा मृत्यू संशयास्पद पेल्हार पोलीस आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. मृत अंजलीचा शवविच्छेदन अहवाल शनिवारी प्राप्त झाल्यानंतर अंजलीचा मृत्यू हा गळ्यावर वार केल्याने झाल्याचे समोर आले. त्यानंतर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेरा वर्षाच्या तिच्या भावाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
Nalasopara Crime : आई-वडील कामावर, घरात असं काय घडलं, की….तेरा वर्षाच्या भावाने सात वर्षाच्या लहान बहिणीला संपवलं; कारण हैराण करणारं
आपणच सात वर्षाची बहीण अंजलीची कटरने वार करून हत्या केल्याचे तेरा वर्षाच्या भावाने कबूल केले. सात वर्षाच्या बहिणीची हत्या करणारा अल्पवयीन मुलगा तेरा वर्षाचा असला तो अनेक वेळा नापास झाला असून उनाड आहे. आई – वडील दररोज कामावर जात असल्यामुळे दोघेही अल्पवयीन भाऊ, बहीण घरात एकटे असत. सात वर्षाच्या अंजलीने मोठ्या भावाला उन्हात खेळायला जाऊ नको असे सांगितले. त्यातून या दोघा भाऊ- बहिणीमध्ये भांडण झाले, त्याच्या रागातून तेरा वर्षाच्या भावाने आपल्या सात वर्षाच्या बहिणीची हत्या केली.

