Monsoon Harbour Railway : हार्बर लोकल विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वे आणि महापालिका अधिकारी यांनी हायड्रोलिक सर्वेक्षण करुन पाण्याच्या विसर्गासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील भुयारी मार्ग, चेंबूरस्थित शेल कॉलनी येथील भुयारी मार्ग नाला, टेंभे पूल, शहर विभागातील चुनाभट्टी रेल्वे स्थानक, हिंदमाता पावसाळी पाणी साठवण टाकी इत्यादी ठिकाणांची पाहणी केली, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजनांसंदर्भात निर्देशही दिले.
Ajanta Boat : ‘गेटवे ते मांडवा’ प्रवासात थेट बोटीत शिरलं पाणी; अजंता प्रवासी बोटीचा वाहतूक परवाना निलंबित
चुनाभट्टी रेल्वे स्थानक, हायवे सोसायटी, रेल्वे स्थानकातील मोरी (कल्व्हर्ट), समर्थ नगर सोसायटी, वांद्रे कुर्ला संकुल जोडरस्त्याखालील परिसर आदी भागांचीही बांगर यांनी पाहणी केली. हायवे सोसायटी ही जमिनीच्या पातळीपेक्षा खालच्या भागात वसलेली असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हे पाणी पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या पर्जन्य जलवाहिनीत सोडण्यात येते. तेथून हे पाणी रेल्वे स्थानक परिसरात येते. रेल्वे स्थानकातील पर्जन्य जलवाहिनीची वहन क्षमता कमी असल्याने अतिवृष्टीवेळी पाणी रेल्वे रुळांवर साचते. त्यामुळे हार्बर लोकल सेवा विस्कळीत होते.
यावर उपाय म्हणून रेल्वेकडून जल साठवण टाकीमधील पाण्याचा उपसा करून ते समर्थ नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकले जाते. हे पाणी बीकेसी कनेक्टरखालील नाल्याला मिळते. या नाल्याचे खासगी विकासकामार्फत काम सुरू आहे. त्यांनी हे काम ३१ मे २०२५ पूर्वी करावे. नाल्याचा उतार योग्य राहील, याची खातरजमा करावी. चुनाभट्टी रेल्वे स्थानक भागात रेल्वे आणि महापालिका यांनी हायड्रोलिक सर्वेक्षण करून पाण्याचा विसर्ग करण्याचे कोणते मार्ग असू शकतात याची पडताळणी करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले.
Ulhasnagar News : लोकलमधून पडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, उल्हासनगर – अंबरनाथ दरम्यान रेल्वे अपघातात दुर्दैवी अंत
महाराष्ट्र नगर, हिंदमाताबाबतही निर्देश
मानखुर्द, महाराष्ट्र नगर येथील भुयारी मार्गाजवळ एका बाजूला रस्ते काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे. हा भुयारी मार्ग सखल भागात असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे येथे रेल्वे हद्दीत लघु पाणी उपसा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यात पुरेशा क्षमतेची साठवण टाकी बसवण्यासह अन्य कामांचा समावेश आहे. येथील सध्याचे उपसा केंद्र अधिक परिणामकारकरीत्या कार्यान्वित ठेवावे, असे निर्देश बांगर यांनी दिले. शहर भागात हिंदमाता या सखल भागातील पाणी निचरा व्यवस्थेची पाहणी करून येथील साठवण टाकीवर फ्लो मीटर बसवावे, तसेच सातही पंपांची क्षमता एकसमान करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
Harbour Railway : हायड्रोलिक सर्वेक्षण, ‘आयओटी’ तंत्रज्ञान; आता पावसाळ्यात हार्बरची धाव विनाअडथळा
‘आयओटी’ तंत्रज्ञानाची मदत
पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी, त्या ठिकाणी अतिरिक्त उर्दचन यंत्रणा (पंप) स्थापन करावी, पर्जन्य जलउपसा करणाऱ्या पंपांना आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) तत्त्वावर आधारित तंत्रज्ञानाची जोड देत सेन्सर बसवावेत. या सेन्सर्सची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वास्तविक वेळ (रियल टाइम) मिळावी, जेणेकरून पंप सुरू आहे की नाही याची माहिती त्याचवेळी उपलब्ध होऊ शकेल, असेदेखील निर्देश बांगर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

