नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबीर सुरू झाले आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या शिबिरात मार्गदर्शन करणार असून राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या शिबिरात उपस्थित आहेत. शिबिराच्या सुरुवातीलाच खासदार संजय राऊत यांनी निष्ठावान नेत्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम घेतला. यावेळी पहिलीच मुलाखत ही ठाण्याचे शिवसेनेचे निष्ठावंत राजन विचारे यांची घेण्यात आली. राजन विचारे हे खरे ठाणेकर आहेत असं म्हणत राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.