जालनातील जलजीवन मिशन अंतर्गत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. विशेष म्हणजे भाजप आमदार नारायण कुचे यांनीच याबाबत गंभीर आरोप केलाय. ‘हर घर जल हर घर नल’ या पंतप्रधान मोदींच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे ते म्हणाले. ठेकेदार असो की अधिकारी, कारवाई नक्की होणार असा इशारा कुचेंनी दिला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरही त्यांनी भाष्य केले.