• Fri. Apr 25th, 2025 8:28:20 AM

    Beed News : प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू, रक्तस्त्राव होत असताना त्यांनी… बीड जिल्ह्यात आठवडाभरातील दुसरी घटना

    Beed News : प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू, रक्तस्त्राव होत असताना त्यांनी… बीड जिल्ह्यात आठवडाभरातील दुसरी घटना

    Beed Crime News : बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीदरम्यान छाया पांचाळ यांचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. व्यवस्थित प्रसूतीसाठी पैशाची मागणी करूनही उपचार न केल्याने महिलेचा बळी गेल्याचा आरोप पतीने केला. आठवड्यातील ही दुसरी घटना असून, दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

    Lipi

    दीपक जाधव, बीड पुण्यातील प्रसिद्ध रूग्णालय दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये भाजप आमदारांच्या स्वीय सहाय्यकांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. हे प्रकरण चर्चेत असताना बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छाया गणेश पांचाळ असे मयत मातेच नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपये पण आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार केले नाहीत, असा गंभीर आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

    आठवडाभरातील माता मृत्यूची ही बीड जिल्हा रुग्णालयातील दुसरी घटना आहे त्यामुळे खळबळ उडाली आहेत. रक्तस्त्राव होत असताना तिथल्या कर्मचाऱ्याला महिला कर्मचाऱ्याला उपचार करा असं सांगितलं असता आम्ही सर्वजण निघून जातो तुम्हीच तुमच्या पेशंट वर उपचार करा असं उद्धट उत्तरही दिल्याचं मयताच्या आईने सांगितलं. अतिरक्तस्राव सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी पाठवले व त्यानंतर रक्ताची पिशवी मागवली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाली आणि त्याच कालावधीत मृत्यू झाला तरी या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील नातेवाईकांनी केली आहे.

    नॉर्मल प्रसूती झाली, त्यानंतर रक्तस्राव सुरू झाला. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांनी वेळेवर उपचार केले नाहीत तसेच रक्त पिशवी आणायला उशिरा सांगितली असा आरोप केला आहे. तसेच एवढे सिरीयस पेशंट असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बाहेरून रक्त आणायला का सांगितले. नॉर्मल डिलिव्हरी मध्ये रक्तस्त्राव झाला कसा यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशाची मागणी केली. 2000 देऊनही व्यवस्थित प्रसूती केली नाही माझ्या पत्नीचा बळी गेल्याचा आरोप मयत महिलेच्या पतीने केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed